श्री क्षेत्रगाणगापूर
श्री क्षेत्रगाणगापूर माहात्म्य
भारतात वैष्णव आणि शैव पंथ याप्रमाणेच दत्तसंप्रदाय हा पण एक परमेश्वर उपासनेचा प्रमुख पंथ आहे.
दत्तमहाराज्यांचे तीन अवतार आहेत.
१)श्री दत्तात्रेय: अत्रिमुनी व अनसूया सती यांचे सुपुत्र.
२)श्रीपाद श्रीवल्लभ: आंध्रप्रदेशात पिठापूरला माता सुमती आणि आपाळराजा यांचे उदरी जन्म झाला. मौंजी बंधनानंतर त्यांनी कुरवपूर जि. रायचूर (कर्नाटक) येथे १२ वर्ष वास्तव्य केले.
३)श्री नृसिंह सरस्वती: विदर्भात करंजनगर कारंजा येथे माता अंबाभवानी आणि पिता माधव यांचे उदरी शके १३०१(इ.स. १३७९) मध्ये जन्म झाला. यांचे वास्तव्य जवळजवळ २३ वर्ष गाणगापूरला झाले. तसेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे पण दत्तांचेच अवतार आहे. अक्कलकोट हे गाणगापूर पासून जवळच आहे.
गाणगापूर - गाणगापूर हे पुणे-रायपूर रेल्वेमार्गावर १४ मैलांवर आहे. ते भीमा अमरजा संगमावर वसलेले आहे. इथेच श्री नृसिंह स्वरस्वतींचे वास्तव्य २३ वर्ष झाले. येथे त्यांनी अनेक लीला केल्या. "श्री गुरुचरित" या ग्रंथात त्यांच्या अनेक लीला वर्णन केलेल्या आहेत.
बहुधान्य संवत्सर शके १४४० च्या सुमारास श्री गुरु निजानंदी बसले. त्यांनी श्रीदोत्य येथे गमन करून कठली वनात प्रवेश केला आणि तेथूनच त्यांनी माधव सरस्वतींना खास निरोप देऊन सिध्दांकडे पाठविले व प्रसादाचे कमलपुष्प दिले. श्री गुरूंचे सर्वकार्य गाणगापूर येथेच घडले व आपल्या दिव्योदात्त विभूतीभावाचे सर्व तेज या भूमीच्या अणुरेणूत संक्रमित केले. म्हणूनच गेली ५ शतके हे स्थान दत्तोपासकाच्या दृष्टीने असीभ श्रद्धेचे झाले आहे.
गाणगापूरातील महत्वाची दर्शन स्थळे :-
१) भीमा अमरजा संगम :- गावापासून 3.५ कि.मी. अंतरावर आहे. येथे भीमा अमरजा नदीचा संगम आहे. या संगमावर स्नानाचे फारच महत्व आहे. संगमाजवळ औदुबर वृक्ष आहे. त्याचे जास्त महत्व आहे. येथे भाविक प्रदिक्षणा घालतात व श्रीगुरुचरीत्राचे पारायण करतात. तसेच तेथे श्रीस्वामींचे मंदिर आहे व भस्माचा डोंगर आहे. पूर्वी तेथे भस्म खूप मिळत असे, सध्या प्रमाण कमी झाले आहे.
२)मुख्य गावातील मठ व निर्गुण पादुका स्थान :-
येथे दगडी मोठे भव्य मंदिर असून येथेच श्री स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत. येथे आवारात अश्वस्थ वृक्ष(पिंपळ) आहे त्यांचीही अपार महिमा आहे. मंदिरात मूळ निर्गुण पादुका ठेवलेल्या कोनाडा सिंहवदानाच्या आकाराचा होता. सध्या त्याला चौकोनी आकार देण्यात आला आहे. मंदिरात त्रिमूर्ती दर्शन व निर्गुण पादुका दर्शन महत्वाचे मानले जाते
३)कल्लेश्वर :- हे स्थान निर्गुण मठापासून ५०० मी. अंतरावर आहे. येथे रोज सायंकाळी दिव्यांचे आरास करतात. तसेच येथे शनिमंदिर आहे. संगम, निर्गुण मठ व कल्लेश्वर या तीनही स्थानांचे दर्शन केल्यास गाणगापूर यात्रा पूर्ण होते असे म्हणतात.
४)अष्टतीर्थ :- संगम हे कल्लेश्वर या ४ कि.मी. अंतरावर अष्टतीर्थ आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे
(१) षटकुळ
(२)नृसिह तीर्थ
(३)भागीरथी तीर्थ
(४)पापविनाशी तीर्थ
(५)कोटी तीर्थ
(६)रुद्रपार तीर्थ
(७) चक्रेश्वर तीर्थ
(८)मन्मथ तीर्थ(कल्लेश्वर).