धार्मिक महत्व :

गंगा पापं, शनी तापं, दैन्यं कल्पतरुस्तथा ।

पापं,  तापं च दैन्यं च  हरेच्छीगुरुदर्शनास ।।

 

श्रीमन्नृसिंह सरस्वती यांचे चरित्र “श्रीगुरुचरित्र” या प्रसिद्ध ग्रंथातील ही ओवी असून याचा अर्थ असा आहे :

 

गंगास्नानाने पापनाश होतो तर चंद्राच्या शांतपर दर्शनाने दिवसभरची अंगाची लाही शांत होते. तसेच कल्पवृक्षाच्या छायेत बसल्याने दारिद्र्यनाश होते. परंतु या तिन्ही गोष्टींची फलश्रुती फक्त श्रीगुरुदर्शनामुळे मिळून जन्मजन्मांतरीचे कष्ट निवारण होऊन अतीव समाधान (मानसिक शांतता )मिळते. हेच या तीर्थक्षेत्राचे धार्मिक महत्व असून संबंध भारतातील हे महत्वाचे “श्रीगुरुस्थान” आहे. “श्रीगुरुचरित्र” हा ग्रंथ वेदसमान असून त्याची पारायणे व अनुष्ठान करणाऱ्यांना त्याची प्रचिती येते.