गाणगापुरातील महत्वाची दर्शन स्थळे :

१.    भीमा अमरजा संगम : गावापासून ३.५ किमी अंतरावर आहे. येथे भीमा व अमरजा नदीचा संगम आहे. या संगमावर स्नानाचे फारच महत्व आहे. संगमाजवळ औदुंबर वृक्ष आहे त्याचे फारच महत्व आहे. तेथे भाविक प्रदक्षिणा घालतात व गुरुचरित्राचे पारायण करतात. तसेच तेथे स्वामींचे मंदिर आहे व भस्माचा डोंगर आहे. पूर्वी तेथे भस्म खूप मिळत असे सध्या प्रमाण कमी झाले आहे.

 

२.    मुख्य गावातील मठ व निर्गुण पादुका स्थान : येथे दगडी मोठे भव्य मंदिर असून तेथेच श्री स्वामींच्या निर्गुण पादुका आहे.

 

३.    कल्लेश्वर दर्शन गावापासून १/२ किमी अंतर : कल्लेश्वर दर्शन व शनैश्वर दर्शन.

 

४.    अष्टतीर्थ : संगम ते कल्लेश्वर सुमारे ४ किमी पद्य व प्रत्येक तीर्थावर स्नान.